वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

घटनास्थळी पंकज कुमावतांची धाव

नांदूरघाट दि.22 ः दगडाने ठेचून एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. ही घटना केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथे शनिवारी (दि.22) सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील नांदूर घाट येथून जवळच असलेल्या हंगेवाडी येथे सखुबाई बन्सी शिंदे या पारधी समाजातील 60 वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला आहे. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे घटनास्थळावर पोहोचले आहेत. त्या ठिकाणी संशयित मारेकर्‍याचे काही वस्तू असल्याचा संशय असून अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले आहे. पोलीस पथकातील कर्मचारी मेसे, भालेराव, शिवाजी शिनगारे, मतीन शेख हे तपास करीत आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पोहोचले असून ते तपास घेत आहेत. यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरलेले दगड व इतर साहित्य जप्त केले आहे.

Tagged