अंबाजोगाई : वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
या निर्णयानुसार अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एम.डी. (जनरल मेडिसीन) विषयाच्या अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत ३ ची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी एम.डी.साठी ३ जागा उपलब्ध होत्या, त्या आता ६ असणार आहेत. तर, एम.एस. (जनरल सर्जरी) या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश क्षमता २ जागांनी वाढली आहे. एम.एस.साठी यापूर्वी ३ जागा होत्या, नवीन निर्णयानुसार आता ५ जागा असतील.