बकराचा गेला चोरीला; कंदुरीचा कार्यक्रम लांबणीवर!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाईतील घटना

अंबाजोगाई : कंदुरीसाठी आणलेला बकरा रात्रीतून चोरी गेल्याची घटना शहरात बुधवारी (दि.१९) रात्री घडली.

शहरातील एका व्यक्तीने कंदुरीचा कार्यक्रम करण्यासाठी येथील मंगळवारच्या बाजारातून एक बकरा आणला होता. गुरुवारी कंदुरी असल्याने त्यांनी हा बकरा मंगळवारी व बुधवारी रात्रीच्या वेळी घराच्या बाहेरील अंगणात बांधला होता. बकरा बाहेर बांधला जात असल्याचे लक्ष ठेवून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री हा बकरा चोरून नेला. बकरा चोरून नेल्याने गुरुवारी होणारा कंदुरीचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे.

Tagged