accident

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोन ठार

क्राईम माजलगाव

माजलगाव, दि.20: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजता घडली.

शहरातील मम्मी-डॅडी कलेक्शन येथे काम करणारे राजस्थान येथील राजेंद्रसिंग बन्सीलाल (वय 26) रा. कक्करणा ता.आवर जिल्हा जालोर व मनीष कुमार सोनी (वय 22) रा. खडव जी. वाडनेर हे दोन तरूण काही कामानिमित्त माजलगावहून परळीकडे दुचाकीवरून जात होते. याच दरम्यान लहामेवाडी फाटा येथे गुरुवार दि.20 रोजी रात्री 7.30 वा. दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी पाचवड येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर मोमिन यांच्यासह नागरिकांनी धाव घेऊन त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, बीट आमदार सुनिल आइतवार, पोलीस कर्मचारी शेख रफीक यांनी ग्रामीण रुग्णालयात अपघात स्थळी भेट दिली होती.

मदत करणार्‍या तरुणांचा प्रामाणिकपणा
अपघातग्रस्त तरुणांकडे पाच लाख पाच हजार रुपये रोख होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जुबेर मोमिन, सय्यद नाजेर, अनिस अन्सारी यांनी ही रक्कम माजलगाव ग्रामीण पोलिसांकडे जमा केली. यावेळी हिदायत खान शेख मकसुद आदी उपस्थित होते.

Tagged