वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी आरटीओ कार्यालय केलं बंद

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

परवानाधारकांसह, वाहनधारकांची कामे रखडली

बीड : दि.4 बीड येथील आरटीओ कार्यालय मागील अनेक वर्षापासून प्रभारीवर आहे. त्यात येथील काही वरिष्ठ क्लार्क उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी कार्यालयच बंद केलं आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

मागील अनेक वर्षापासून आरटीओ कार्यालयातील कामकाज सुरुळीत सुरु नाही. अधिकारी जागेवर हजर नसतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दलालांचा गोंधळ सुुरु असतो. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. आता तर हद्द झाली असून वरिष्ठ क्लार्क उपस्थित राहत नसल्यामुळे कामकाज सुरुळीत चालत नाही. तसेच वाहनधारक, परवानाधारक हे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांना दमदाटी, अरेरावी करतात. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी कार्यालयच बंद केले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे सर्व वाहने जाग्यावरच उभी होती. आता लॉकडाऊन उघडले असल्यामुळे वाहनधारक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी आरटीओ कार्यालयात खेटे घालत आहेत. परंतू येथील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे वेठीस धरण्याचा प्रकार घडत आहेत. त्यात आता तर काही कर्मचार्‍यांनी कार्यालयच बंद केले आहे. याकडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लक्ष देवून संबधितांना सुचना देण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊना करण्यात आले होते. यामुळे सर्व वाहने एकाच ठिकाणी उभी होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता लॉकडाऊन उघडले आहे. परंतु आरटीओ कार्यालयात कागदपत्रांसाठी, विविध परवान्यांसाठी वाहनधाराक खेटे घालत आहेत. मात्र अधिकारी, कर्मचारी जाग्यावर नसल्यामुळे आरटीओ कार्यालय बंद करण्यात आले आहे. ही चुकीची बाब असून याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
विजयनाना काकडे, बीड

Tagged