MURDER

एसपी ऑफिस परिसरात पेटवून घेणार्‍या आरोपीवर गुन्हा दाखल

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अत्याचाराच्या गुन्ह्यात होता फरार ; खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
बीड
दि.24 : माझ्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपीने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. ही घटना मंगळवारी (दि.23) रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान घडली. येथील नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांनी तातडीने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता प्रकृती स्थीर असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील एका विधवा महिलेची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात प्रवासा दरम्यान विसरली होती. पर्स वापस देण्याच्या बहान्याने पिंपळे याने महिलेस बीडमधील कबाड गल्लीतील रुमवर बोलून घेतले व या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 2014 साली घडली होती. या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत ऑटोरिक्षा चालकाने तिला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. त्याचप्रमाणे त्याचा नातेवाईक असणार्‍या गोरख इंगोले याच्यासोबतही तिला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. पुढे गोरख इंगोलेनेही ब्लॅकमेल करून तिच्यावर सतत अत्याचार केला. त्यानंतर 2015 साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. तर 2020 मध्ये गोरख इंगोले याने जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरूड ते हिवरा पहाडी रोडलगत असणार्‍या घाटात नेले. तेथे त्याच्या 4 मित्रांकडून आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार केला. यामुळे महिला गर्भवती राहिली. गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करून घेण्यासही पीडित महिलेस भाग पाडले. हा सर्व छळ त्रास सहन न झाल्याने पीडित महिला माजलगावला आली. येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागली. परंतू येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. वारंवारचा मानसिक व शारिरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने बीड शहर ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतः ला पेटवून घेतले. नियंत्रण कक्षातील पोलीसांनी त्याला तत्काळ बाजूला असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या प्रकृती स्थीर असल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सुर्यकांत अंधाळे यांच्या फिर्यादीवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार तोंडे करत आहेत.

सर्व आरोपी फरारच
या प्रकरणी सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन आठवडा लोटला तरी एकही आरोपीला पोलीसांकडून अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान यातील मुख्य आरोपीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेतले.

Tagged