12 आमदार

12 आमदारांचं प्रकरण संजय राऊतांकडून स्पष्ट

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. हि मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. त्याच संदर्भात माध्यमांनी राऊतांशी चर्चा केली. यात संजय राऊत यांना माध्यमांनी 12 आमदारांचं नेमकं काय प्रकरण आहे असा सवाल केला त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

“देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे. आम्ही वरमाला घातल्या आहेत, आमच्यात कोणताही आंतरपाट नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील तीन प्रमुख पक्षांनी बनवलेलं आहे. ही खिचडी नाही. काल शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यांनीही ठाम विश्वास व्यक्त केला आहे की, हे सरकार पाच वर्ष काम करेल, असं राऊत म्हणाले. राज्य चालवताना अनेक प्रसंग येतात. पहिल्यांदाच बदल्यांना स्थगिती दिलेली नाही. काही माध्यमे म्हणतात मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. काही म्हणतात गृहमंत्र्यांनी स्थगिती दिली. कुणी स्थगिती दिली हे आधी ठरवा, मग मी उत्तर देईल. बदल्यांसंदर्भात मुख्यमंत्री अंधारात नव्हते. नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

काय आहे 12 आमदारांचं प्रकरण? काय म्हणाले संजय राऊत?
15जूनला राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची मुदत संपलेली आहे. घटना हि देव व धर्मापेक्षा महत्त्वाची आहे, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. त्यांचा मी चेला आहे. मला असं वाटतं हा देश आणि राज्य हे घटनेनुसार चालावं. घटनेनं जे अधिकार लोकनियुक्त सरकारला, संसदेला आणि दोन्ही सभागृहांना दिले आहेत त्या अधिकारांचं हनन होऊ नये. त्यासंदर्भात आघाडी सरकार व राज्यपालांमध्ये चर्चा सुरू आहे. मला जे वाटतं जे दिसतं ते मी लिहितो. माध्यमांना काही षडयंत्र दिसत असेल तर समोर आणावं, असं राऊत म्हणाले.

Tagged