अनलॉक-4 संदर्भात नियमावली जाहिर
मुंबई : अनलॉक-4 संदर्भात नियमावली जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ई-पास शिवाय राज्यात प्रवास करण्यात येणार आहे. तसेच निवासी हॉटेल्स, लॉज सुरु राहणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र जिम, मेेट्रो, चित्रपटगृह तुर्तास बंदच राहणार असल्याची माहिती आहे. 30 सप्टेेंबर पर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मीकस्थळे बंद राहणार आहेत.
मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.