अन् डोळ्यासमोर वडीलांचा जिलेटिनच्या स्फोटात मृत्यू!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड 24 : शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. त्यात खडक फोडण्यासाठी ब्लास्टींगला आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधवर झाकून ठेवलेल्या होत्या. परंतू याची माहिती शेतकर्‍याला नव्हती. आज सकाळी शेतकर्‍याने बांध पेटवला, त्याची आग जिलेटिनच्या कांड्यापर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच असलेल्या मुलाला जीलेटीनची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथून बाजूला व्हा, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे धावला, परंतू काही क्षणात जिलेटिनच्या मोठा स्फोट झाला. या घटनेत शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा व बाजूला असलेला पोकलेनचा ऑपरेटर जखमी झाला आहे. ही घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील राक्षसभुवन येथे बुधवारी (दि.24) सकाळी घडली.

आप्पासाहेब मस्के (वय 35) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्या शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. मागील दोन दिवसापासून काम बंद होते. मात्र विहिरीतील खडक फोडण्यासाठी ब्लॉस्टिंगसाठी आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधावर झाकून ठेवलेल्या होत्या. याची माहिती शेतकरी आप्पासाहेब मस्के यांना नव्हती. आज सकाळी ते बांध पेटवत होते. बांधाची पेटलेली आग ही जीलेटीनपर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच काम करत असलेल्या त्यांच्या मुलाला जीलेटीन तिथे ठेवल्याची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथे ठेवलेल्या जीलेटीनची माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे धावला परंतू तेवढ्यात मोठा स्फोट झाला. यामध्ये अप्पासाहेब मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा व बाजूला असलेला पोकलेन ऑपरेटर जखमी झाला आहे. जखमींवर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Tagged