डॉ.खोसे यांच्यावर प्राणघातक हल्ला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

आरोपींना तात्काळ अटक करण्याची डॉक्टर संघटनेची मागणी

बीड : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर यशवंत खोसे यांचे चिरंजीव डॉक्टर शिरीष खोसे यांच्यावर शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता शुल्लक कारणावरून हा प्रकार घडला. या घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी डॉक्टर संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे.
बीड शहरातील प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ म्हणून डॉक्टर खोसे सर्वपरिचित आहेत. मागील काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयात ते कोविड रुग्णांना उपचार देत आहेत. नवगण राजुरी परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपावर कार्ड कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि डॉक्टर खोसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यानंतर खोसे यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. दरम्यान त्यांच्या खिशात असलेले पैसे आणि मौल्यवान दागिने देखील चोरीस गेले. डॉक्टर खोसे यांच्यावर बीड येथील काकू नाना हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी डॉक्टर संघटनांनी केली आहे.

Tagged