daroda, gharfodi

वडवणी पोठोपाठ नेकनूर हद्दीत दरोडा!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


दाम्पत्यास मारहाण करत लाखोंचा ऐवज केला लंपास
नेकनूर
दि.4 : नुकतेच वडवणी शहरातील चार ते पाच दुकाने फोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा नेकनूर हद्दीत वळवल्याचे दिसत आहेत. येथील वडवाडी गावात दरोडा टाकत दाम्पत्यास मारहाण करुन त्यांच्या अंगावरील दागिने व घरातील रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.

बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान शाहूराव आवचर (रा.वडवाडी ता.बीड) यांची घरी गुरुवारी (दि.4) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांना धाडसी दरोडा टाकला. यावेळी अभिमान अवसर यांंना मारहाण करत त्यांच्या हातातील अंगठ्या व त्यांच्या पत्नी सत्वशीला आवचर यांनाही मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडून घेतले. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटातील रोख रक्कम लंपास केली. फिर्यादीकडून सहा ते 9 लाखांचा ऐवज चोरी गेल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. वडवणी तालुक्यातील चोरीच्या घटनानंतर नेकनूर हद्दीतील वडवाडी येथे धाडसी चोरीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी वरिष्ठांची धाव

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख यांनी धाव घेतली. तसेच श्वान पथक, ठसे तज्ञ आदींना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. तपास सुरु असल्याची माहिती सहायक निरीक्षक मुस्तफा शेख कार्यारंभशी बोलताना यांनी दिली.

Tagged