ग्रामपंचायत उमेदवारी अर्जासाठी उरला अवघा दीड दिवस

न्यूज ऑफ द डे बीड

नेटवर्क प्रॉब्लेममुळे अर्ज ऑनलाईन होईनात; ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी

धारूर/सचिन थोरात
दि.१ : बीड जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम लागलेल्या 704 ग्रामपंचायतीची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा दीड दिवसाचा अवधी शिल्लक आहे. परंतु मागील दोन दिवसापासून नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्याने ऑफलाइन पद्धतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील सातशे चार ग्रामपंचायत चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक विभागाने सर्व प्रक्रिया गतिमान केल्याचे दिसून येत आहे. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा दीड दिवस शिल्लक राहिलेला आहे यात उमेदवारी अर्ज ऑनलाईन करण्याची प्रक्रिया ही नेटवर्क प्रॉब्लेम मुळे अडचणीची ठरत आहे. यामध्ये ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिलेल्या दीड दिवसात ऑनलाईन अर्ज करणे हे नेटवर्कमुळे अडचणीचे ठरले आहे.यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी इच्छुक उमेदवारांमधून केली जात आहे.

Tagged