निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
बीड : ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज आता ऑफलाईन दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.
बीड जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर तक्रारच्या आहेत. सर्व्हर हँग होत असल्याने अनेकांना अर्ज भरता आलेले नाहीत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. तसेच धनंजय मुंडे यांनी देखील ऑफलाईन अर्ज भरू देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आईवगने ग्रामपंचायत साठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे.