केशव कदम | बीड
दि.30 : देवस्थान जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मंगळवारी (दि.29) रात्री आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार रामदास सूर्यभान खाडे (रा.करेवाडी ता. आष्टी जि.बीड) आरोपी आ. सुरेश रामचंद्र धस, प्राजक्ता सुरेश धस, मनोज रत्नपारखी, देविदास रामचंद्र धस, अस्लम नवाब खान यांच्यासह इतरांवर 29 नोव्हेंबर रोजी बीड गु.र.नं.386/2022 कलम 13(1)(अ) (ब),13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सह कलम- 420, 465, 467, 468,471, 120 (ब)109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जदार रामदास खाडे यांनी ला. प्र. वि. बीड येथे दि.13 जानेवारी 2022 रोजी दिलेले अर्जासंदर्भाने उच्च न्यायालय खंड पीठ औरंगाबाद क्र.746/2022 दि.18 ऑक्टोबर 2022 चे आदेश वरून सुरेश धस यांनी पदाचा कर्तव्याचा गैरवापर इतर आरोपींच्या संगनमताने कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत. असे भासऊन ईतरांशी संगनमत करून देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. व बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.