आयएएस तुकाराम मुंढे यांची बदली

न्यूज ऑफ द डे बीड

नियुक्तीसाठी करावी लागणार प्रतीक्षा

बीड : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक तुकाराम मुंढे यांची बदली केली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी काढले आहेत.

मुंढे यांनी आपल्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे आणि अतिरिक्त स्वरुपात सोपविण्यात आलेल्या प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे, असे निर्देश त्यांना दिले आहेत. तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचा आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर अनेक तक्रारी वाढल्या होत्या. वास्तवाचे भान न ठेवता त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आरोग्य विभागाचे काम ढेपाळले होते. राज्यातून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करण्याची मागणी शासनाकडे केली होती. अखेर मंगळवारी त्यांच्या उचलबांगडीचे आदेश प्राप्त झाले. दरम्यान, त्यांची इतर ठिकाणी नियुक्ती केली नसून त्यांना पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Tagged