DEVENDRA FADANVIS

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ आदेश

बीड

हातात बंदूक घेऊन फोटो काढणाऱ्यांवरही कारवाई

बीड : राज्यभरात गाजत असलेल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊले उचलले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांसह सीआयडीला दिले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या मोर्चानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊले उचलत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. ही प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे म्हटले आहे. तसेच, बीड जिल्ह्यातील अनेकांचे हातात बंदूक असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा सर्व फोटोतील बंदूक खरे असतील तर संबंधितांचे शस्त्र परवाने तात्काळ रद्द करावे असे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसह सीआयडीला दिले आहेत.

Tagged