सिरसाळा दि.27 : वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलल्याच्या कारणावरून काही तरुणांनी बस चालकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत चालकाला हृदय विकाराचा झटका आल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्रकृती चिंताजनक असून मारहाण करणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.
नागनाथ गित्ते असे बस चालकाचे नाव आहे. त्यांनी एका वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलले, ज्यामुळे संतापलेल्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी गित्ते यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचले आणि नियंत्रण राखले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.