शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक कोरोनाबाधित

न्यूज ऑफ द डे बीड

संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे केले आवाहन

बीड : कोरोना काळात आरोग्य सेवेसाठी फिल्डवर असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांना लक्षणे जाणून लागल्याने त्यांनी आज चाचणी केली असता ते बाधित असल्याचे समोर आले.

  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन, खाटांचा तुटवडा यासह कोविड केअर सेंटरमधील समस्यांचा सामना करावा लागत असल्याने सचिन मुळूक हे स्वतः गेल्या आठ दिवसांपासून फिल्डवर उतरले होते. त्यांनी जिल्हा रूग्णालयात पाहणी करून आढावा घेतला, तेथील स्वयंपाक गृहास अचानक भेट देऊन जेवणाची तपासणी करून दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. केजमध्येही थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन समस्यांबाबत आक्रमक भुमिका घेतली होती. दरम्यान, त्यांना मंगळवारपासून लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी चाचणी केली असता ते बाधित असल्याचे समोर आले. ही माहिती त्यांनी स्वतःहून दिली आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच, नियमितपणे मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे.

Tagged