court

बाल लैंगीक अत्याचार प्रकरणी आरोपीस दोन वर्षांची सक्तमजूरी!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
बीड
दि.23 : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजूरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड भरला नाही तर आणखी तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांनी सुनावली. शुक्रवारी (दि.23) शिक्षेचा निकाल देण्यात आला.

शरद ज्योतीराम शिंदे (sharad jyotiram shinde) असे शिक्षा झालेल्या आरेापीचे नाव आहे. 29 डिसेंबर 2019 रोजी गेवराई तालुक्यातील एका गावात पीडिता घरी एकटीच असताना शरद शिंदे तिथे आला. तिचा वाईट हेतूने हात पकडून तिला अश्लिल भाषा वापरुन असभ्य वर्तन केले. माझ्यासोबत आली नाहीस तर तुझी बदनामी करेल अशी धमकीही दिली. दरम्यान, पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात विविध कलमांसक पोक्सोनुसार गुन्हा नोंद झाला. तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक वाय.ए. टाकसाळ यांनी या प्रकरणी तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाकडून सादर केलेले पुरावे आणि यक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश आनंद यावलकर यांनी शरद शिंदे यास दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.सुहास सुलाखे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील बी.एस.राख, यांनी सहकार्य केले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून फौजदार बी.बी. जायभाये, सहाय्यक फौजदार सी.एस. इंगळे, सहाय्यक फौजदार एम.व्ही. गायकवाड, श्रीमती एस.ए. चव्हाण यांनी काम पाहिले.

Tagged