MAJALGAON DAM

माजलगावचे धरण भरण्यास आता इतक्याच पाण्याची आवश्यकता

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव, दि.11 ः माजलगाव धरण भरण्यास अवघे दिड फुट राहिले आहे. सध्या धरण 89.62 टक्के भरले असून धरण क्षेत्रात पाण्याची आवक 1716 क्युसेकने होत असल्याची माहिती माजलगाव धरणाचे शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी सांगीतले.

माजलगाव धरणाच्या पााणी पातळीत मागील काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्प हा पुर्ण क्षमतेने भरल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्याव्दारे 600 क्युसेकने पाणी माजलगाव धरणात सोडण्यात आले आहे. परंतू काही ठिकाणी-लिकेज असल्याने ते माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात जवळपास 400 क्युसेकने दाखल होत आहे. तर पाणलोट क्षेत्रातून 1300 क्युसेकने आवक होत आहे. अशी एकुण 1716 क्युसेकने माजलगाव धरणात आवक असून शनिवारी रात्री 6 वा. पर्यंत 89.62 टक्के धरण भरले आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघा दिड फुट बाकी आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 431.380 मी., एकुण पाणी साठा 421.600 दलघमी, उपयुक्त पाणीसाठी 279.600 दलघमी, पाऊस 00/704 मिमी आहे.
माजलगाव धरण 100 टक्के भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती माजलगाव धरणाचे शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी ’कार्यारंभ’शी बोलताना दिली.

पाणलोट क्षेत्रातील पावसाकडे प्रशासनाचे लक्ष
माजलगाव धरण 89 टक्के भरले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याव्दारे 400 क्युसेक तर पाणलोट क्षेत्रातून 1300 क्युसेक अशा 1700 क्युसेकने आवक धरणात होत आहे. त्यात आता धरणाच्रूा पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला तर केव्हाही हे धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

Tagged