माजलगावाच्या ‘त्या’ सर्वानाच वाचवण्यात यश

माजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली. देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading
saandas chincholi

माजलगावातील सांडस चिंचोली, डेपेगावचा दळण-वळणाचा संपर्क तुटला

माजलगाव, राजापूर, दि.18 : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराने गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या 42 हजार क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वरतून जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने विसर्ग सुुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि तेथून खाल्याच्या गावांना सुमारे दिड […]

Continue Reading
sindfana prakalp

सिंदफणा प्रकल्पही भरला; नागरिकांनी सतर्क रहावे

शिरुर, दि.16 : बर्‍याच वर्षानतंर सुरुवातीपासुनच चांगला पाउस पडला. त्यामूळे सिंदफणा प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सिंदफणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असल्या कारणाने सिंदफना प्रकल्प ओव्हर झालेला आहे. सध्या या प्रकल्पातून सिंदफणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याचा फायदा माजलगाव धरणाला होणार आहे. सिंदफणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading
bindusara prakalp

बिंदुसरा प्रकल्प भरला! आता माजलगावची बारी

नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी केले जलपुजन बीड, दि.16 : बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा प्रकल्प 99 टक्के भरला असून ते आता छोट्या चादरीवरून केव्हाही वाहण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने याचा परिणाम आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बिंदुसरा भरल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहरासाठी पिण्याचा पाण्याचा […]

Continue Reading