माजलगावाच्या ‘त्या’ सर्वानाच वाचवण्यात यश

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव


माजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली.

शिवप्रसाद सचिन कदम

देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. त्यामुळे अचानक नदीपात्रात 1 लाख 32 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोठ्यावर पाण्याचा वेढा पडला. कार्यारंभला याची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रथम जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला तातडीने माहिती देण्यात आली. स्थानिकचे आमदार प्रकाश सोळंके यांना देखील माहिती दिली. या सर्वांनी तातडी ओळखून आपत्ती व्यवस्थापनाच्या परळी येथील बचाव पथकाला माजलगावाच्या दिशेने पाठवले. रात्री 10 वाजता या पथकाने आपले काम सुरू केले. मात्र पाल्याच्या फ्लो जास्त असल्याने बचाव पथकाची बोट अडकलेल्यापर्यंत पोहचत नव्हती. रात्रीचा अंधार, वेड्या बाभूलीची झुडुपे, त्यामुळेही मदत करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच जोराच्या लाटेने बचाव पथकाची बोट रात्री 12 च्या सुमारास उलटली. बचाव पथकाने कसाबसा नदी काठ गाठला मात्र पवन कराड हे जवान तिथेच अडकून पडले. त्यानंतर हे मदत कार्य थांबविण्यात आले. पहाटे 3 वाजता पाणी कमी झाल्यानंतर स्थानिक भोई बांधवांनी अडकलेल्या तिघांना देखील सुखरूप बाहेर काढले.

Tagged