११ दरवाजे एका मीटरने उघडले; ७७ हजार क्युसेकने विसर्ग
माजलगाव : येथील धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने धरण शंभर टक्के भरले असून आज (दि.६) पहाटे ६ वाजता ११ दरवाजे दीड मिटरने उघडण्यात आले. धरणातून सिंदफना पात्रात ७७ हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
माजलगाव धरण यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच पाणी पातळी वाढत होती. ऑगस्ट महिन्यात १५-२० दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती मागील २ दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. हे धरण सोमवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरले असता धरणातुन पाणी सोडण्यात आले.हे धरणाची पाणी पातळी ४५४.०० मीटर एवढी आहे. शनिवारी व रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने ११ दरवाजे उघडण्यात आले. धरणात सध्या ७७ हजार ४२१ क्युसेस पाण्याची आवक आहे. तेवढ्याच क्षमतेने पाणी सिंदफना नदी पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.