MAJALGAON DAM

सिंदफणा नदीपात्रामध्ये आज रात्री 10 हजार क्यूसेकने होणार विसर्ग

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव : येथील धरण हे आज (दि.16) सायंकाळी 6 वाजता 97.69 टक्के इतके भरले आहे. आता रात्रीतून हे धरण 100 टक्के होण्याची शक्यता असल्याने सिंदफणा नदीपात्रामध्ये आज रात्री 9 ते 10 या वेळेत 8 ते 10 हजार क्यूसेकने होणार विसर्ग होणार आहे.

माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या माहितीनुसार, माजलगाव धरणात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठी आवक सुरु आहे. त्यामुळे हे धरण 100 टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्री सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिंदफणा व गोदाकाठच्या गावांना सावधानेतचा इशारा देण्यात आला आहे. तसे जिल्हा प्रशासनाकडूनही आवाहन करण्यात आले आहे.

Tagged