परळीच्या एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी पॉझिटीव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्याला आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 251 स्वॅब swab नमुन्यांपैकी तब्बल 9 नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णसंख्या आता 31 झाली आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील अन्य 3 जण इतर जिल्ह्यात उपचारादरम्यान पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आज पॉझिटीव्ह आढळून आलेल्यांमध्ये परळीतील एसबीआय शाखेच्या parali sbi branch पाच कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

    जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार ceo ajit kumbhar यांनी दिलेल्या माहितीनुसार आज परळी येथील 5, (28 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष), तर शिरूर तालुक्यातील राळेसांगवी येथील 1 (भिवंडीहून आलेले), बीड शहरातील 2 त्यात अजिजपुरा येथील (40 वर्षीय महिला), आणि डीपी रोडवरील 1 (45 वर्षीय पुरुष) यांचा रुग्णात समावेश आहे. तर अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील पुण्याहून आलेली (65 वर्षीय) महिला पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे.
      बीड जिल्ह्यातील 3 रुग्ण आज बाहेर जिल्ह्यातही पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. त्यात बालेपीरमधील 1 औरंगाबादेत, आष्टी तालुक्यातील कारखेल येथील 1 नगरमध्ये आणि पाटोदा तालुक्यातील 1 पुण्यात पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
       जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णसंख्या 31 आहे. त्यात बीड जिल्हा रुग्णालयात 13, अंबाजोगाई/परळी 8, रुग्ण उपचार घेत आहेत. तर बाहेर जिल्ह्यात उस्मानाबादेत 1, औरंगाबाद 4, मुंबई 1, पुणे 1, नगरमध्ये 3 रुग्ण उपचार घेत आहेत, असेही थोरात म्हणाले. बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 146 वर जाऊन पोहोचली आहे.

परळी एसबीआयच्या पाच कर्मचार्‍यांना गुरुवारी लक्षणं दिसू लागल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर आज पहाटे त्यांचे स्वॅब घेण्यात आले असता त्यात ते पॉझिटीव्ह आढळून आले. त्यांना नेमकी कशी लागण झाली याची माहिती नाही. परंतु आता प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं आहे. कारण परळीतील याच शाखेतून सर्व तालुक्याचा कारभार चालतो. या बँकेत नेहमीच मोठी गर्दी असते. अनेकांचा या कर्मचार्‍यांशी दररोज संपर्क येत असतो.

परळीतील एसबीआय शाखेच्या कर्मचार्‍यांना लागण

कंटेनमेंट झोन containment zone घोषित
दरम्यान पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आष्टी तालुक्यातील कारखेल, बरडेवस्ती, पाटोदा तालुक्यातील येवलवाडी, टेकाळेवस्ती, नेमानेवस्ती हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
READ E -PAPER karyarambh

बीड जिल्ह्याला धक्का, 9 पॉझिटीव्ह

Tagged