परळी शहरासह १८ गावे सील

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे परळी

बीड जिल्हाधिकारी यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात

बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.४) कोरोनाचे ९ रुग्ण आढळून आले. या कोरोनाग्रस्तांपासून इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर पुढील ८ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. तर परळीसह अंबाजोगाई, शिरूर तालुक्यातील एकूण १८ गावे अनिश्चित कालावधीसाठी सील केली आहेत. याबाबतचे आदेश दि.५ रोजी मध्यरात्री १ वाजून ५५ मिनिटांनी जारी केले आहेत.

दरम्यान, शनिवारी आढळलेल्या ९ रुग्णांपैकी ५ जण हे परळी शहरातील एसबीआय शाखेतील कर्मचारी आहेत. ते परळी शहरासह तालुक्यातील १६ गावातील नागिरकांच्या संपर्कात आल्याचा प्रशासनाचा संशय आहे.

कंटेनमेंट झोन घोषित क्षेत्र पुढीलप्रमाणे
परळी तालुका : शहर, बेलंबा, बोधेगांव, दैठणा घाट, दाऊतपुर, इंजेगाव, जिरेवाडी, कासारवाडी, कावळ्याचीवाडी, कौडगांव घोडा, कौठळी, नंदनज, नाथ्रा, परळी (ग्रा.), पिंपळगाव गाढे, सारडगांव, टाकळी आचार्य
शिरूर कासार तालुका : राळेसांगवी
अंबाजोगाई तालुका : बागझर

परतीच्या याच शाखेत 5 कर्मचारी कोरोना possitive आढळून आले आहेत.

कंटेनमेंट झोन घोषित क्षेत्र पुढीलप्रमाणे
परळी तालुका : शहर, बेलंबा, बोधेगांव, दैठणा घाट, दाऊतपुर, इंजेगाव, जिरेवाडी, कासारवाडी, कावळ्याचीवाडी, कौडगांव घोडा, कौठळी, नंदनज, नाथ्रा, परळी (ग्रा.), पिंपळगाव गाढे, सारडगांव, टाकळी आचार्य
शिरूर कासार तालुका : राळेसांगवी
अंबाजोगाई तालुका : बागझरी

Tagged