बीड, दि.29 : शहरापासून जवळच असलेल्या तळेगाव परिसरातील मस्के यांच्या शेतात यश स्पोर्ट क्लबमध्ये मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकण्यात आला. या छाप्यात तिर्रट नावाचा जुगार खेळताना 47 जुगारी आढळून आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात क्लब चालक, जागा मालक अशा 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावेळी पोलीसांनी रोख दिड लाख रुपयांसह, वाहने असा 75 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केली.
याप्रकरणी पोह.बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आनंत उर्फ बाळू शंकरराव शिनगारे (वय 45 रा.यळंबघाट), प्रल्हाद शंकर चित्रे (वय 36 रा.पालवन), अभिमान अर्जुन बागलाने (वय 59, रा.काकडहीरा), आनंद विठ्ठलराव ढास (वय 55 रा.घारगाव ता.बीड), बाळाचार्य मनोहर घोलप (वय 46 रा.तळेगाव ता.बीड), बिभीषण महादेव उदबत्ते (वय 31 काळा हनुमानठाणा, बीड), मोहन नारायण सिन्नोर (वय 52 काळा हनुमानठाणा, बीड), तात्यासाहेब अंबादास बहीर (वय 45 रा.रुई ता.वाशी), प्रदिप तुकाराम थोरात (वय 35 रा.कामखेडा), एकनाथ बाळनाथ खांडे (वय 41 रा.अंकुशनगर बीड), चत्रभुज भवानी वाघमारे (वय 38 रा.हिवराबावडी), पंडित आश्रुबा परझने (वय 34 खालापूरी ता.बीड), हनुमंत बाजीराव बहीर (33 रा.रुईपारगाव ता.वाशी), हरीदास जनार्धन घोगरे (55 नंदनवननगर बालेपीर), राहुल विठ्ठल वंजारे (42 रा.येळंबघाट), कल्याण ज्ञानोबा पारखे (32 रा.हिवरापहाडी), भगवान आश्रुबा पवार (45 रा.काळेगाव हवेली), सुरेश आदीनाथ काकडे (37 रा.जरुड), ज्ञानेश्वर पांडूरंग जगताप (45 रा.एकनाथनगर बीड), सय्यद जमीरोद्दीन कमरोद्दीन (55 रा.शिरापूर धुमाळ), उमेश चंद्रकांत जाधव (38 शिरापूर धुमाळ), भास्कर विठ्ठल जायभाये (49 रा.काकडहीरा), अशोक रामचंद्र सानप (47 कालिकानगर, बीड), राजु चांदमिया पठाण (39 रा.पारगाव), शेख एकबाल शेख हाजी (48 रा.राजुरीवेस कटकटपुरा), लक्ष्मण पांडुरंग शिंदे (45 रा.गिरामगल्ली बीड), उद्धव अभिमान घोलप (32 रा.तळेगाव), नितीन भागवत शिनगारे (रा.येळंबघाट), चंद्रकांत भीवाजी त्रिमुखे (29 रा.नांदूरघाट), श्रीराम रावसाहेब मुंजाळ (50 रा.निगडी जि.पुणे), निलेश तुळशीराम सवासे (26 रा.शुक्रवार पेठ,बीड), रमेश गुलाब औसरमल (45 रा.शिरापुर धुमाळ), त्रिंबक संतोबा वीर (52 रा.सुर्डीखोत), सुधिर आबासाहेब सुपेकर (59 रा.शिवणी), धनंजय मिठ्ठू कसपटे (32 रा.नवगन राजुरी), पारसनाथ मनोहर रोहिटे (33 रा.आहेरवडगाव), संतोष चंद्रसेन बहिर (29 रा.नवगण राजुरी), संतोष सर्जेराव गावडे (35 रा.नवगण राजुरी), बाळु कारभारी कावळे (36 रा.बावी), बापुराव विठ्ठल घोडके (42 रा.लोळदगाव), नामदेव प्रल्हाद लाटे (32 रा.बेलुरा), दुषांत रोहिदास ससाणे (34 रा.पालवण), विकास अशोक मस्के (34 रा.पालवण), अशोक भिवराव मस्के (38 रा.अर्धमसला), संभाजी श्रीधर गिराम (38 रा.पारगाव ता.वाशी), मोहन मधुकर सुर्यवंशी (30 रा.पाथरी), बंडू किसन काळे (49 रा.कालिकानगर, बीड), कल्याण ज्ञानोबा पवार (रा.दगडीशहाजनपूर), भाऊसाहेब हनुमान सावंत (रा.नवी मुंबई), राजेंद्र तुकाराम मस्के (रा.बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंंकज कुमावत यांच्या टिमने केली. पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आवारे करत आहेत.