क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह 51 जणांवर गुन्हा दाखल!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र


सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई

बीड दि.28: शहरापासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरातील राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकला. यावेळी 48 जुगाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात राजेंद्र मस्के यांच्यासह 51 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 48 जण पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही आरोपीत समावेश असल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.


भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या चऱ्हाटा फाटा येथील जागेत आलिशान क्लब सुरू होता. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. या क्लबवर छापा मारला असता 48 जुगाऱ्याना ताब्यात घेतले, तसेच त्यांच्याकडून दीड लाख रोख, 25 व्हीआयपी गाड्या, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींनी हंस क्लब राजेंद्र मस्के यांचा असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्यासह 51 जनांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 48 जण पोलिसांच्या ताब्यात असून तिघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित जागा ही माझी नसून मोठे बंधू यांच्या मालकीची आहे. त्यांनी ती जागा भाडेतत्वावर दिली होती. त्यात माझा काहीही संबंध नाही.

राजेंद्र मस्के
भाजपा जिल्हाध्यक्ष, बीड

Tagged