डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

पुणे एसीबीची कारवाई
बीड दि.20 : अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी पाच लाखाची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर आणि इतर दोन पोलीस कर्मचार्‍यांना पुणे आणि औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.20) सकाळी करण्यात आली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


तक्रारदारास अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी पाच लाखाची मागणी करण्यात आली होती. तडजोडअंती तीन लाखाची मागणी केली अखेर दोन लाख रुपयांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी सुधीर अशोक खिरडकर यांच्यासह पोना.संतोष निरंजन अंभोरे, पोशि. विठ्ठल पुंजाराम खार्डे यांना अटक करण्यात आले. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोनि.सुनिल क्षीरसागर, पोह.नवनाथ वाळके, पोशि.किरण चिमटे, पोशि.दिनेश माने यांनी केली. त्यांना औरंगाबाद येथील पथकाने मदत केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged