आता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

न्यूज ऑफ द डे बीड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती; पुढील परीक्षेची तारीख…

बीड : येत्या रविवारी म्हणजेच २ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी केली आहे.

राज्य शासनाच्या विविध भरतीच्या परीक्षा आणि पेपरफुटी प्रकरणे राज्यभरात चांगलीच गाजत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.६१/ कार्या-१२. दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अन्वये शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवारी, दि.२ जानेवारी, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे, अशी घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. तसेच, परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

Tagged