lockdown

सहा शहरांसह ग्रामीण भागातही लॉकडाऊन?

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील ६ शहरे १० दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. त्यानंतर आता ६ शहरांबरोबरच ग्रामीण भागातही लॉकडाऊन होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

   जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत (दि.१०) रोजी पार पडलेल्या बैठकीत ६ शहरांबरोबरच ग्रामीण भागातही लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा झाली आहे. यावेळी आ.प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, शिवाजी सिरसाट, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड, अंबाजोगाई, केज, माजलगाव, परळी व आष्टी ही ६ शहरे लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा केली. यावेळचा लॉकडाऊन ब्रेकडाऊन ठरावा, त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत. तसेच, ६ शहरांबरोबरच ग्रामीण भागातही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Tagged