बनावट कागदपत्र;आरटीओ कार्यालयातील एजंटसह अर्जदारावर फसवणुकीचा गुन्हा!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


केशव कदम – बीड

दि.08 : बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (beed rto office) फसवणुकीच्या घडत सातत्याने आहेत, कारण येथील एजंट कुठल्याही कामात बनावटपणा करत मधल्या मार्गाने अधिकचे पैसे कमावण्यासाठी शासनाला चुना लावतात. अशा फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वीही पोलिसात गुन्हे दाखल झालेले आहेत. 6 जुलै रोजी वाहन ट्रान्सफर करण्यासाठी चक्क बनावट चरित्र प्रमाणपत्र सादर केले. ही बाब येथील वरिष्ठ लीपिकाच्या निदर्शनास आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंटसह अर्जदारावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात (beed gramin police station) शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वरिष्ठ लिपिक रविंद्र विठ्ठलराव साबने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 6 जुलै रोजी ॲटोरिक्षा परवान्यासाठी इरफान खान या एजंटने शेख ईकबाल शेख खुर्शीद या व्यक्तीचे रिक्षा परवान्यासाठी शासकीय फी 500 रुपये भरून मूळ अर्जासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेले चारित्र्य प्रमाणपत्र सादर केले. कार्यारंभ न्युज – कागदपत्राची पडताळनी करीत असताना त्या कागदपत्रामध्ये शेख ईकबाल शेख खुर्शीद या व्यक्तीचे चारित्र्य प्रमाणपत्रावर फोटो नसल्याने ते बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळे ही कागदपत्र प्रादेशिक परीवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या निदर्शनास आणून दिले. माने यांनी सदरील प्रमणपत्रची पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठवून माहिती मागितली. तेव्हा हे प्रमाणपत्र प्रदिप अंकुश वडमारे (रा.प्रकाश अंबेडकर नगर बीड) या मूळ अर्जदारास 12 डिसेंबर 2022 मध्येच डिजिटल स्वरूपात दिल्याचे लेखी कळवले. एजंट ईरफान खान आणि शेख ईकबाल शेख खुर्शीद (रा.बलभीम चौक बीड) यांनी संगनमत करुन कोणत्यातरी संगणकावर शेख ईकबाल शेख खुर्शीद याचे बनावट चारित्र्य प्रमाणपत्र बनवले व त्या प्रमाणपत्राद्वारे परीवहन ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. तसेच शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. कार्यारंभ न्युज – या प्रकरणी दोघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 468, 471, 34 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास बीड ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत.

Tagged