शुभम डाके यांच्या निवडीचे युवासैनिकांकडून स्वागत

न्यूज ऑफ द डे बीड

युवासेनेची ताकद वाढविणार : शुभम डाके

बीड : शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या माजलगावच्या डाके कुटुंबातील शुभम अनिलराव डाके यांची नुकतीच युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली. त्यांच्या निवडीचे जिल्हाभरातील युवासैनिक, शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे.

शुभम डाके हे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षांपासून सक्रियपणे काम करत आहेत. त्यांच्या पक्ष कार्याची व संघटन कौशल्याची दखल घेऊन युवासेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते माजलगावसह केज, अंबाजोगाई, परळी तालुका कार्यक्षेत्रात निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान जिल्ह्यात युवासेनेची ताकद वाढविणार असल्याचे नवनियुक्त युवासेना जिल्हाप्रमुख शुभम डाके यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना म्हटले आहे,.

माजलगाव युवासेना शहर प्रमुखपदी विशाल थावरे
माजलगाव शहरासह तालुक्यात तरुण वर्गामध्ये मोठे नेटवर्क असलेले विशाल थावरे यांची माजलगाव युवासेना शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, माजलगाव शहर व तालुक्यात युवासेनेची ताकद वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे थावरे यांनी म्हटले आहे.

Tagged