bharat biotech

खुशखबर : भारताची लस 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होणार

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

 

7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याचे आयसीएमआरचे भारत बायोटेक कंपनीला निर्देश

नवी दिल्ली, दि.3 : जगाला धडकी भरविणार्‍या कोरोनाची लस भारताने विकसीत केलेली असून त्याची लवकरात लवकर क्लिनीकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआरने ICMR भारत बायोटेक कंपनीला दिले आहेत. 7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करावं, असेही आयसीएमआरने म्हटले आहे.

भारत बायोटेकला भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) सोबत एकत्र येऊन तयार केली आहे. 

आयसीएमआरचे महासंचालक डॉ.बलराम भार्गव यांनी एक पत्र जारी केलं असून यात 7 जुलैपासून या लसीची मानवी चाचणी सुरु होईल. यामुळं 15 ऑगस्टपर्यंत सामान्यांसाठी लॉन्च केलं जावं, असं म्हटलं आहे. भारत बायोटेकने  जायडस कॅडिला या औषधाला देखील  कोविड-19 वर इलाज म्हणून विकसित केलं आहे. या औषधाला देखील क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी कोविड 19 वरील जायडस कॅडिला या औषधासाठी फेज 1 आणि फेज 2 मध्ये मानवी चाचणीला परवानगी दिलीय. देशात एकूण कोरोनामुळं मृतांची संख्या 18 हजार 213 झाली आहे.

Tagged