पुणे, दि.31 : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे याचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्यासह मनोज डोंगरे याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने आता तपास करत आहोत.
तुकाराम सुपे याने पाठविलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट अन्य आरोपींना पाठविण्याचे काम सुनील घोलप हा करत असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती आहे.
घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याची माहिती आहे.