गेवराई दि.31 : अंधश्रद्धेच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील खांडवी येथे शुक्रवारी (दि.31) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संजीवनी पिराजी शेजुळ (वय 60 रा.खांडवी ता.गेवराई) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. पिराजी शेजुळ (वय 65) असे आरोपीचे नाव आहे. अंधश्रद्धेच्या संशयातून संजीवनीचा खून केला. वृद्ध पत्नीचा खून केल्याच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी सांगितले.