मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये -छत्रपती संभाजीराजे

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई : मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये. आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सर्वांनी मराठा आरक्षणाला सहकार्य करावे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. ओबीसी नेत्यांनी आज (दि.29) मुंबईत छत्रपती संभाजीराजें भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

ओबीसी समाजाच्या ज्या चिंता आहेत त्या ऐकून घेण्याची विनंती हरिभाऊ राठोड यांनी केली. संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजासोबत सहकार्याची भावना घेऊन मदत करेल असाही शब्द त्यांनी दिला. त्यांच्यासोबत मुस्लीम, ओबीसी समाजाचे अध्यक्ष युनूस मणियार, बारा बलुतेदार संघटना आणि कुंभार समाजाचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांनी ही भावना व्यक्त केली की, राजर्षी शाहूंच्या वारसदाराने आमची भूमिका समजून घेतली. संभाजीराजेंनी जी मराठा आरक्षण मागत असताना बहुजन समाजाच्या एकीसाठीची सर्व समावेशी भूमिका घेतली आहे. त्यासोबत आम्ही आहोत, असे विधान मुस्लिम ओबीसी नेते युनूस मणियार यांनी सांगितले.

Tagged