atyachar

पैठण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

५७ दिवसानंतर बिडकीन
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पैठण दि. २५ :- पैठण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पैठण येथे आणून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. सदरील अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यामुळे ५७ दिवसानंतर बिडकीन पोलिसांनी बुधवारी (दि.२५) रात्री एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान बिडकीन परिसरातील नरसिंग तांडा येथे राहणाऱ्या विशाल चव्हाण या युवकाने आपल्या दुचाकीवर अल्पवयीन मुलीला पैठण येथील आणून तिच्यावर बळजबरीने एका पडक्या बंद घरामध्ये अत्याचार केला. त्यामुळे सदरील अल्पवयीन मुलगी तीन महिन्याची गरोदर राहिली आहे. पीडितेने बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे पोलिस निरीक्षक पंकज उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आरोपीविरुद्ध कलाम ३७६ भा द वि सह कलाम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण हे करीत आहे.

Tagged