गॅस स्फोटात तीन घरे जळून खाक!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव


माजलगाव तालुक्यातील
मोगरा तांडा येथील घटना

माजलगाव दि.25 : अचानक गॅसचा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी (दि.25) दुपारी माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शिवाजीनगर तांडा येथे घडली.
मोगरा जवळच असणार्‍या शिवाजी नगरतांडा येथे घरगुती गॅसला अचानक आग लागली. यामुळे लागलेल्या आगीने काही वेळातच रूद्र रूप धारण केले. प्रकाश पवार, अशोक पवार, विकास पवार या तिन्ही भावांचे या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर तहसील कार्यालयाकडून घराचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान या आगीत घरे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Tagged