माजी आ.आर.टी. देशमुख यांच्या अंगरक्षकांची भाजप बूथ प्रमुखास हातपाय तोडण्याची धमकी

न्यूज ऑफ द डे माजलगाव

सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल

माजलगाव – भाजप बूथप्रमुखांच्या एका ग्रुपमध्ये माजी आमदार देशमुख यांना एका कार्यक्रमात डावल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची बातमी प्रकाशित झाली होती.या बातमी खाली कमेंटमध्ये एका बुथ प्रमुखाने कोणीही नाराज नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.अशी कमेंट का टाकलीस म्हणत माजी आमदार देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्या बूथ प्रमुखास हातपाय तोडण्याची धमकी दिली असल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.दरम्यान या धमकीवजा ऑडिओ क्लिपमुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दोन दिवसापुरती पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळावा खासदार प्रीतम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता.या कार्यक्रमात माजी आमदार आर.टी.देशमुख यांना डावलण्यात आले होते.दरम्यान दुसऱ्या दिवशी काही सोशल मिडीया वर देशमुखांना डावलल्याने कार्यकर्ते नाराज,अशा आशयाची कमेट केली होती.या कमेट वर तालुका भाजपाच्या बूथप्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सोडण्यात आली होती.यावेळी या कमेट खाली कमेंट मध्ये केसापुरीचे गेल्या वीस वर्षापासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते व बूथप्रमुख छबन घाडगे कोणीही नाराज नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.या व्यक्त केलेल्या प्रतिक्रियाचा जाब विचारत माजी आमदार आर टी देशमुख यांचे अंगरक्षक देशमुख यांनी तुला मार खायचा आहे का?तुला खूप माज आला आहे का?तुला गोडीची भाषा समजत नाही का? गेल्या वर्षी पण तुला समजावून सांगितले होते.तुझे दात पाडू का? तुझे हातपाय काडीन अशी धमकी दिली.या दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप भाजपाच्या वर्तुळात वेगाने पसरल्याने काही काळ शहरात भाजप कार्यकर्त्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी आडसकर समर्थक मोठ्या संख्येने छत्रपती संभाजी महाराज चौकात जमा झाले होते. दरम्यान या वेळी रमेश आडसकर यांनी औरंगाबाद येथून तात्काळ आपला दौरा आटोपून माजलगाव गाटले व कार्यकर्त्यांना शांत केले.

Tagged