शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात हाणामारी;उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

केज क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना दगड व लाकडाने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होती. दरम्यान यातील जखमी चुलत्याचा रविवारी (दि.27) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

आडस येथील गायके परिवारात मागील काही दिवसांपासून शेती व झाडावरुन वाद सुरू आहे. या वादातून चुलते-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना दगड व लाकडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मला जमीन का देत नाही म्हणून पुतण्या संदीप यांने मारहाण केली. अंकुश नामदेव गायके हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्याही डोक्यात लाकडी फळी मारुन जखमी केले. अशी फिर्याद विजय नामदेव गायके यांनी दिली होती. त्यावरून आरोपी संदीप प्रभाकर गायके याच्या विरुद्ध शनिवारी (दि. 26) धारुर पोलीस ठाण्यात कलम 326, 323, 504, 506 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आल होता. तसेच पुतण्या संदीप प्रभाकर गायके यांच्या फिर्यादीवरून विजय नामदेव गायके, अंकुश नामदेव गायके, नामदेव गायके, दयानंद गायके या चौघांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अंकुश नामदेव गायके यांना डोक्याला जबर मार लागल्याने उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर येथून लातूर येथे हलविण्यात आले होते. लातूर येथे उपचारा दरम्यान अंकुश गायके यांचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीसांनी संदीप गायके यास ताब्यात घेतले आहे.

Tagged