beed dcc

सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

न्यूज ऑफ द डे राजकारण

सहकारमंत्र्यांची माहिती

मुंबई/बीड : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेल्या सुमारे 47 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.

महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा ‘अ’ वर्गातील 116 मोठ्या सहकारी संस्था, सहकारी नागरी बँका, क्रेडीट सोसायटी, कर्मचार्यांच्या क्रेडीट सोसायटी अशा ’ब’ वर्गातील मध्यम स्वरूपाच्या 13 हजार 85, छोट्या क्रेडीट सोसायटी, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा ‘क’ वर्गातील 13 हजार 74 आणि ग्राहक संस्था, कामगार संस्था अशा ‘ड’ वर्गातील 21 हजार संस्था अशा एकूण 47 हजार 276 सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या होत्या. आघाडी सरकारने या क्षेत्रावर प्राबल्य प्रस्थापित करण्यासाठी आणि नंतर गेल्या मार्चपासून करोनामुळे टप्या टप्याने या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळता इतर सर्व संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्यावर 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. या निवडणुकीच्या निमित्ताने होणारी गर्दी आणि लग्न सोहळे यामुळे ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. हे संपूर्ण वृत्त लोकसत्ताने प्रकाशीत केले आहे.

बीड जिल्हा बँकेचे काय?
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननी झालेले आहेत. परंतु बीड बँकेची निवडणूक हायकोर्टाच्या निर्णयानंतर लागलेली आहे. त्यामुळे बीड जिल्हा बँकेची निवडणूक स्थगित होणार नाही.

बीड जिल्हा बँकेत निवडणूक होणारे
मतदारसंघ आणि वैध ठरलेले उमेदवार

इतर संस्था वैयक्तीक- शिराळे नवनाथ मोतीराम, देशमुख दत्तात्रय त्रिंबकराव, मुंडे सुग्रीव नरहारी, तोंडे महादेव तुकाराम, आंधळे अमोल दिनकरराव, मुंडे धनराज राजाभाऊ, काळकुटे आशाबाई किशोर, मुंडे फुलचंद राजाभाऊ, पंडित बदामराव लहूराव, शेंबडे राधाकिसन भागवतराव, जायभाये श्रीमंत एकनाथ, हिंदोळे शहादेव मारोती, आजबे शशीकांत साहेबराव

नागरी बँक पतसंस्था- आगे गंगाराम रामराव, लोढा संगीता अशोक, शेळके महारूद्र नारायणराव, मोदी राजकिशोर कांताप्रसाद, सोनवणे विलास भीमराव, सारडा आदित्य सुभाषचंद्रजी, सानप चंद्रकांत भांजीबा, आंधळे संजय केशवराव, धोंडे रंगनाथ गोपीनाथ, मिसाळ सत्यसेन गोपाळराव, घुमरे दीपक दत्तात्रय.


कृषी पणन व प्रक्रीया- खाडे रामदास सुर्यभान, नाटकर भाऊसाहेब कचरू, मराठे असाराम धोंडीराम, बडे संगीता शिवाजी, सोनवणे बजरंग मनोहर, काळे जगदीश वासुदेवराव, गुंडे केरबा गोपीनाथ

इतर मागास वर्गीय- आखाडे कल्याण तात्यासाहेब, धोंडे राजेश आनंदराव, परदेशी दिनेश जगन्नाथ, धोंडे रंगनाथ गोपीनाथ.

महिला राखीव- पवार सुशीला शिवाजी, साबळे प्रयाग ज्ञानोबा, शेळके कल्पना दिलीप
अनुसुचित जाती जमाती- खंडागळे यशवंत कोंडीबा, भोसले दिलीप ज्ञानदेव, उजगरे परमेश्वर नागोराव, दळवी रविंद्र उत्तमराव, उजगरे वर्षा सतिश.

विशेष जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग- गर्जे महेंद्र गोविंदराव, सानप वसंतराव असाराम, मुंडे सुग्रीव नरहरी, ढाकणे मधुकर पांडुरंग, तोंडे महादेव तुकाराम, बांगर विजयसिंह रामकृष्ण, मुंडे सुर्यभान हनुमंतराव, प्रभाळे नवनाथ फकीरराव, मिसाळ वैजेनाथ मारोती, सानप चंद्रकांत भोंजीबा, आंधळे अमोल दिनकरराव, आंधळे संजय केशवराव, मिसळ सत्यसेन गोपाळराव, जायभाये श्रीमंत एकनाथ.

Tagged