मातोरीजवळ कार पलटी होऊन दाम्पत्याचा मृत्यू

क्राईम गेवराई मराठवाडा महाराष्ट्र


मयत दाम्पत्य माजी मंत्री सुधीर
मुनगंटीवार यांचे नातेवाईक

मातोरी : दि.24 कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर मातोरी परिसरात भरधाव कार कंट्रोल न झाल्याने कार नाल्यात कोसळली. यामध्ये दोघा पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला. सदरील दाम्पत्य हे भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण ममता तगडपल्लेवार व भाऊजी विलास तगडपल्लेवार हे स्विफ्ट डिझायर कारने (एमएच-29 आर-4230) जात होते. कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर मोतोरी परिसरामध्ये कारवरील ताबा सुटल्याने कार नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारचा अक्षरशः चुरा झाला आहे. यामध्ये विलास तगडपल्लेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर ममता तगडपल्लेवार यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. घटनास्थळी चकलांबा पोलीस ठाण्याचे फौजदार डिगांबर पवार यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहे. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाच अपघात झाल्याची अफवा जिल्हाभरात पसरली होती.

Tagged