dhananajay munde, renu sharma

धनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई- मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या महिलेविरोधात एका भाजपा नेत्याने पोलीसात धाव घेतल्यानंतर आता आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. कृष्णा हेगडे यांनीच याबाबत माहिती दिली. हेगडे यांच्या म्हणण्यानुसार मनसेचे मनिष धुरी यांनचाही मला फोन आला असून त्यांच्याही सोबत माझ्यासारखाच प्रकार घडला. त्यामुळे आता रेणू शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्या आरोप करणारी महिला ही गायिका आहेत. त्यांच्या बहीण आणि धनंजय मुंडे हे दोघेही परस्पर सहमतीतून एकमेकांच्या संबंधात होते, असा खुलासा मुंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे केला होता. आता भाजपा नेते कृष्णा हेगडे मुंडे यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार रेणू शर्मा या ब्लॅकमेलर आहेत. 2010 पासून त्या मलाही ब्लॅकमेल करीत होत्या. आज धनंजय मुंडे त्याचा बळी ठरले आहेत. येथून पुढे कोणीही त्याचा बळी ठरू नयेत, असे मत कृष्णा हेगडे यांनी केला आहे. हेगडे म्हणतात या महिलेने मला 6 व 7 जानेवारी रोजी मेसेज करून आप मुझे भूल गये है क्या? असा मेसेजही केला होता. संबंधीत महिला मलाही परस्पर संबंध ठेवण्यासाठी मला भाग पाडत होती. आता मी अंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी चाललो असल्याचे हेगडे म्हणाले. आज धनंजय मुंडे याचे बळी ठरले पण मी त्याही आधी मी या महिलेचा बळी ठरलो असतो, असेही हेगडे म्हणाले. माझ्या तक्रारीनंतर अशी अनेक प्रकरणं बाहेर निघतील असाही विश्वास हेगडे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यात
कृष्णा हेगडे यांनी दिलेली माहिती बरोबर आहे. 2008 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्माने माझे कुठूनतरी नंबर मिळवले आणि मला फॉलो करायला लागली. तिने मला जवळीकता साधत व्हिडिओ बनवायचा तिचा प्रयत्न होता. मला जेव्हा समजले त्याचवेळी मी अलर्ट झालो. हा महिलांचा विषय असल्याने त्यावेळी मी कुठे काहीच बोललो नाही. त्यानंतर ही महिला 2018-19 मध्ये पुन्हा माझ्या संपर्कात आली होती. त्यावेळी तिने मला ब्लॅकमेलींग टाईप मेसेज केले होते. एका महिलेला तिची बहीण दाखवून मला तिच्या रुमवर देखील नेले होते, असेही मनिष धुरी यांनी माध्यमांला सांगितले.

Tagged