school

दहावी, बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा, महाविद्यालये तात्पुरते बंद

न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा, महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात यावेत, असा आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बुधवारी दिले आहेत.

आजच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे दिला होता. त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमांच्या सर्व शाळा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही शाळा बंदी 10 मार्चपर्यंत असणार आहे, असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेशात म्हटले आहे.