pankja munde

गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच- पंकजाताई मुंडे

न्यूज ऑफ द डे परळी बीड मराठवाडा राजकारण

गुरुपोर्णिमेनिमित्त पंकजाताईंनी केलं गरुचं स्मरण

बीड : भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीला यशाच्या शिखारापर्यंत पोहचवण्यामागे गुरुचा हात असतो. आज गुरुपोर्णिमा असून पंकजाताई मुंडे यांनीही आपल्या गुरुचे स्मरण केले आहे. त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.

पंकजाताई मुंडे यांचे गुरू म्हणजे त्यांचे वडिल स्व.गोपीनाथराव मुंडे ज्यांचं बोट धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आज त्यांची उणीव त्यांना भासते आहे. गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागवली आहे. माझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूंनी मला शिकवले थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही. तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. नुकतीच भाजपची राज्य कार्यकारिणी जाहिर झाली असून यामधून पंकजाताई मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी त्यांच्या भगिनी खा.प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही, हा पंकजा यांचा मेसेज सूचक मानला जातोय.