corona

बीड जिल्ह्याला धक्का, 9 पॉझिटीव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.4 : जिल्ह्यातील एकूण 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9  स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 242 स्वॅब निगेटीव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.

आज आढळून रुग्ण खालील प्रमाणे

05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय पुरुष

01-राळेसांगवी ता शिरूर-,45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)

01-अजीज पुरा ,बीड -40 वर्षीय महिला

01-डीपी रोड,बीड-45वर्षीय महिला

01- बागझरी ता अंबाजोगाई- 65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)
(प्रिंट मिस्टेकमध्ये थोड्ा वेळापुर्वी चुकून नागझरी झालेले होते. त्याची वाचकांनी दुरुस्ती करून बागझरी असे वाचावे.)

जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य सर्वेदरम्यान व्याधीग्रस्त व लक्षणे असणार्‍यांचे स्वॅब घेतले जात आहेत. आता स्वॅब तपासणीची संख्या वाढविताच रुग्ण वाढलेले आढळून येत आहेत.

बीड शहरात आढळलेल्या काही रुग्णांमुळे शहरात पुर्णपणे संचारबंदी लागू आहे. 9 जुलैपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.

Tagged