suresh dhas

ऊसतोड मजुरांना अडवल्याप्रकरणी आ.सुरेश धसांवर गुन्हा दाखल

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा शिरूर

अटक केल्याची सोशल मीडियावर अफवा

शिरुर  :  उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आमदार सुरेश धस यांनी बुधवारी (दि.16) शिराळ वाकी चौकात मजुरांच्या गाड्या अडवत त्यांना परत जाण्याचे आवाहन केले. यानंतर आष्टी पोलिसांनी आ.धस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
      आष्टी येथे ऊसतोड मजुरांना घेवून जाणार्‍या ट्रक बुधवारी (दि.16) दुपारी आडवण्यात आल्या. ऊसतोड मजुरांना अडविल्याप्रकरणी आ.सुरेश धस, ऊसतोड कामगार संघटनेचे भाऊसाहेब आंधळे यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आ.सुरेश धस हे स्वतःहून ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांना नोटीस देण्यात आली. या संदर्भात त्यांना अटक केल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांना कुठल्याही प्रकारची अटक झोलेली नसून फक्त गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक विजय लगारे यांनी ‘कार्यारंभ लाईव्ह’शी बोलताना दिली.

 

अटक केली म्हणून कार्यकर्त्यांची निदर्शने
आ. सुरेश धस यांना अटक केली असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांनतर शिरुर येथील कार्यकर्त्यांनी जिजामाता चौकामध्ये टायर जाळून घटनेचा निषेध केला. या संदर्भात आ.सुरेश धस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Tagged