ustod-majur-melava-suresh-d

आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर अज्ञातांवर गुन्हा

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा शिरूर

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन

बीड : दि.4 कोरोनामुळे लॉकडाऊन उघडले असले तरी जमावबंदी आदेश लागू आहेत. या आदेशाचे उल्लंघन करत शिरुर शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये उसतोड मजुरांच्या प्रश्नी मेळवा घेण्यात आला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर ते पंचाहत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असताना व शिरुर शहरात कोरोनाचे रुग्ण आहेत हे महिती असतानाही त्या ठिकाणी जमाव जमा केला. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात पोना. मारोती केदार यांच्या फिर्यादीवरुन आ.सुरेश धस, जयदत्त धस, गणेश भांडेकर, अरुण भालेराव, प्रकाश बडे, शिवाजी पवार, बाबुराव केदार, दशरथ वनवे, प्रकाश देसरडा, रामदास हांगे, सुरेश उगलमुगले, कल्याण तांबे, अजय कुरचेरीया, रामदास बडे, अनवर शेख, ज्ञानेश्वर उटे यांच्यासह इतर 50 ते 60 अज्ञातांवर कलम 188, 269, 270 भादवी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमळनेर पोलीस ठाण्यातही गुन्हा
अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही बैठक घेण्यात आली होती. या प्रकरणी आ.सुरेश धस यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged