परळीतील नामांकीत कपड्याने दुकान सील!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे परळी बीड

परळी दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्र्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र परळी शहरात छुप्या पद्धतीने दुकानदार आपली दुकाने सुरूच ठेवत आहेत. शटर खाली ओढून दुकानात गर्दी करतांना दिसून येत आहेत. बुधवारी सामंत कपड्याचे दुकान उघडे असल्यामुळे सील करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कडक आदेश काढले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ज्या आस्थापनांना बंदी आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवली तर त्या दुकानाचा परवाना रद्द करून त्या दुकानाला सील करण्याचे आदेश आहेत. असे असतानाही या नियमाची पायमल्ली करीत परळी येथील प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी सामंत यांचे कपड्याचे दुकान छुप्या पद्धतीने अनेक दिवसांपासून सुरू होते. या दुकानावर परळीचे तहसीलदार शेजुळे व नगर परिषद अधिकारी तथा पोलीस प्रशासनाच्या मदतीने या दुकानावर धडक कार्यवाही करत दुकानाला सील करण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

Tagged